Twin Towers Demolition Video: अवघी काही सेकंद अन् 32 मजली ट्विन टॉवर जमीनदोस्त, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Aug 28, 2022 | 2:52 PM

Noida Supertech Twin Towers: बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेला नोएडातील 32 मजली आणि 102 मीटर उंच टॉवर्स अखेर आज पडण्यात आला.

बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेला नोएडातील (Noida Supertech Twin Towers)  32 मजली आणि 102 मीटर उंच टॉवर्स अखेर आज पडण्यात आला. एपेक्स आणि सेयान हे दोन ट्विन टॉवर ( Twin Towers) तोडण्यापूर्वी आधी सायरन वाजवण्यात आला. तब्बल अर्धा तास या परिसरात सायरन वाजवून हा परिसर निर्मनुष्य झाल्याची खात्री करून घेण्यात आली. संपूर्ण परिसर निर्मनुष्य झाल्यानंतर 3700 किलो स्फोटकांच्या (blast) सहाय्याने हा टॉवर पाडण्यात आला. आधी सायरन वाजवल्यानंतर बरोबर अडीच वाजता धडाम… धडाम… असा आवाज झाला अन् अवघ्या 12 सेकंदात संपूर्ण टॉवर पत्त्याच्या बंगल्यासारखा हा टॉवर कोसळला. हा टॉवर कोसळताना पाहण्यासाठी या परिसरातील इमारतीतील लोक इमारतीच्या टेरेसवर गेले होते. तसेच हा टॉवर कोसळताना पाहण्यासाठी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. टेरेस आणि टॉवर परिसरात जत्रेसारखी गर्दी झाली होती. अनेकांनी तर हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला.

Published on: Aug 28, 2022 02:49 PM
Ambadas Danve | ‘आधी स्वता:च सांभाळा एवढच सांगेन’ दानवे यांच वक्तव्य-TV9
Video: 32 मजली अलिशान टॉवर, धडाम आवाज अन् डोळ्यासमोर पांढरा शुभ्र धूर!, ट्विन पडतानाचा क्षण न् क्षण…