Rs 2000 Ban : ”कुठला काळा पैसा बाहेर येणार?”; राष्ट्रवादी नेत्याची भाजपवर टीका
आरबीआयच्या या निर्णयानंतर राजकारणही तीव्र तापलेलं आहे. यासोबतच अनेक राजकीय प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत. यादरम्यान मोदी सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.
मुंबई : शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी एक धक्कादायक निर्णय घेत RBI ने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध मानल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर राजकारणही तीव्र तापलेलं आहे. यासोबतच अनेक राजकीय प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत. यादरम्यान मोदी सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी भाजपने याच्या आधी केलेल्या नोट बंदीत काय निघालं जे आत्ता परत हेच करायला निघालेच असा सवाल केला आहे. तर आता यावेळी नोट बंदी करून काय बाहेर येणार आहे हे माहित नाही असा टोला लगावला आहे. तर हे फक्त आता इलेक्शन जवळ येत आहेत म्हणून सुरू आहे. याचा अर्थ व्यवस्थेवर खूप वाईट परिणाम होईल ज्यामुळे बदल होतील असेही ते म्हणाले. भाजपवर हल्ला चढवताना तुम्हीच दोन हजराच्या नोटा आणल्यात आणि परत तुम्हीच त्या रद्द करत आहात. त्यामुळे त्या सगळ्यात जास्त कोणाकडे आहे हे सगळ्यांना माहित आहे. तर या नोट बंदीमुळं मोठा व्यक्ती मोठा झाला लहान माणूस लहान झाला. यामुळे सामन्य नागरिकांना त्रास होणार असेही ते म्हणाले.