Kishori Pednekar : एक गाणं व्हायरल झाल्यानं काही होत नाही, जनताच धडा शिकवेल, पेडणेकरांचा शहाजीबापूंना टोला

| Updated on: Sep 01, 2022 | 4:59 PM

सांगोला मतदारसंघात लोक आपल्याविषयी काय बोलतात हे तरी त्यांनी पहावे असा सल्लाही पेंडणेकर यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल असेही त्यांनी सांगून शहाजीबापू केवळ प्रसिद्धीसाठी अशी विधाने करीत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

मुंबई : सांगोल्याचे (MLA Shahai Patil) आमदार शहाजीबापू पाटील यांचे एक गाणं व्हायरल झाले आणि ते राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र, खोटं बोलण्याची पातळी त्यांनी सोडलेले आहे. आपल्या बायकोला कोणी साडी घेऊ शकत नसतंय का असा सवाल (Kishori Pendnekar) किशोरी पेंडणेकर यांनी उपस्थित करीत आता काय साड्या घेऊन द्यायच्या का असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे. एका गाण्यामुळे त्यांच्यात ही आरोप करण्याची हवा शिरलेली आहे. त्यामुळे आपल्या (Sangola) सांगोला मतदारसंघात लोक आपल्याविषयी काय बोलतात हे तरी त्यांनी पहावे असा सल्लाही पेंडणेकर यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल असेही त्यांनी सांगून शहाजीबापू केवळ प्रसिद्धीसाठी अशी विधाने करीत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

Published on: Sep 01, 2022 04:59 PM
Nashik : गोदावरीच्या पुरात चारजण अडकले, अचानक आललेल्या पुरामुळे घडली दुर्घटना
Mahalakshmi : विदर्भात महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी, 56 भोग केले जाणार