नाशिकमध्ये 14 मनसैनिकांना तडीपारीची नोटीस

| Updated on: May 04, 2022 | 9:55 AM

नाशिकमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे सैनिकांकडून शहराच्या काही भागांमध्ये हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न झाला. या सर्व पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी चौदा मनसैनिकांविरोधात तडीपाडीची नोटीस जारी केली आहे.

मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून नाशिकमध्ये वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. नाशिकमध्ये काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमधील 14 मनसैनिकांविरोधात पोलिसांनी तडीपारीची नोटीस जारी केली आहे. तर शंभरहून अधिक मनसे सैनिकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Published on: May 04, 2022 09:55 AM
Nashik : हनुमान चालीसा लावण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
Aurangabad : पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते भूमिगत, औरंगाबादमधील प्रकार