Aditya Thackeray- आता शाळामध्ये मुलांच्या सुरक्षेचा नवीन उपक्रम सुरू करणार – आदित्य ठाकरे

| Updated on: May 11, 2022 | 5:16 PM

शाळेभोवतीचा रस्ता वाहतूकीच्या दृष्टीनं सुरक्षित करण्याचा प्लॅन शासनाकडून आखण्यात आला आहे. त्यासाठी शाळेभोवती स्पिडब्रेकर्स आवश्यक असतील. , विद्यार्थ्यांचे दंत आरोग्य, मधुमेह आणि मानसिक आरोग्यावरही काम होणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे

मुंबई – चारपाच वर्षात शाळांना आवश्यक असणारे इन्फ्रास्टक्चर , एक्स्ट्रा करिक्युलम झालेआहे. मात्र उपक्रम हा विद्यार्थ्याच्या (Students)सुरक्षेबाबत राबवला जाणार आहे अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray)यानी दिली आहे. ते म्हणालेअनेकदा लहान मुलांची रस्ता ओलांडताना अडचण होते. त्यातून अनेकदा अपघातही झाले आहेत. मात्र आता शाळेभोवतीचा 500 मीटरचा परिसर विद्यार्थ्यांकरता सुरक्षित होणार आहेत. शाळेभोवतीचा (School)रस्ता वाहतूकीच्या दृष्टीनं सुरक्षित करण्याचा प्लॅन शासनाकडून आखण्यात आला आहे. त्यासाठी शाळेभोवती स्पिडब्रेकर्स आवश्यक असतील. , विद्यार्थ्यांचे दंत आरोग्य, मधुमेह आणि मानसिक आरोग्यावरही काम होणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांभोवतीच्या धोक्याला स्पीडब्रेकर लागण्यास सहाजिकच मदत होणार आहे. येत्या काही दिवसात या नव्या प्लॅनची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस आहे

 

Published on: May 11, 2022 05:16 PM
Video : मुख्यमंत्र्यांची मर्दानी 14 तारखेच्या सभेत कळेल- रवी राणा
देशद्रोहच्या कायद्याचा अनेक ठिकाणी दुरुपयोग झाला – छगन भुजबळ