HSC Exam Paper Leak | 12 वीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी एकाला अटक, एकूण आरोपींची संख्या आठवर

| Updated on: Mar 10, 2023 | 9:20 AM

बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आरोपींची संख्या वाढताना दिसत आहे. पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एकास अटक करण्यात आली आहे

बुलढाणा : जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये बारावीचा गणिताचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पेपर फुटल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली. त्यानंतर शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. याची चर्चा विधीमंडळातही झाली. त्यानंतर या प्रकऱणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला. आता या प्रकरणात आरोपींची संख्या वाढताना दिसत आहे. पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एकास अटक करण्यात आली आहे. आता याप्रकरणात अटक केलेल्यांची संख्या 8 वर गेली आहे. याच्या आधी बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली होती.

Published on: Mar 10, 2023 09:20 AM
आश्वासन देणारेच गद्दार, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा!, यात मुंबईला काहीच नाही : आदित्य ठाकरे
महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे शिक्षक 14 मार्चपासून संपावर, कोणती आहे प्रमुख मागणी?