Nitesh Rane : चिपी विमानतळावरुन आता दोन वेळा विमानाचं उड्डाण, गणेशोत्सवामुळे निर्णय

| Updated on: Aug 12, 2022 | 8:37 PM

गणेशोत्सावात ही सोय करण्यात आली असून मुंबईकडून कोकणात येणाऱ्यांची संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी तीन वाजता मुंबई येथून अजून एक अतिरिक्त विमान चिपी विमानतळावर येणार आणि ते पावणे पाच वाजता चिपी येथून पुन्हा मुंबईला रवाना होणार आहे. 18 ऑगस्टपासून ही सेवा सुरु होणार आहे. शिवाय हे विमान कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग : कोकणात गणेशोत्सावाचा उत्साह काही न्याराच असतो. मोठ्या धुमधडाक्यात हा उत्सव पार पडला जातो. यंदा गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी असून गणेशोत्सव काळात आता विमान प्रवास सुलभ झाला आहे. मुंबईहून दोनवेळा विमान हे चिपी विमानतळावर येणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांची सोय होणार आहे. मुंबई ते चिपी या प्रवासात आता अजून एक विमानाची भर झाल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. गणेशोत्सावात ही सोय करण्यात आली असून मुंबईकडून कोकणात येणाऱ्यांची संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी तीन वाजता मुंबई येथून अजून एक अतिरिक्त विमान चिपी विमानतळावर येणार आणि ते पावणे पाच वाजता चिपी येथून पुन्हा मुंबईला रवाना होणार आहे. 18 ऑगस्टपासून ही सेवा सुरु होणार आहे. शिवाय हे विमान कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही राणे म्हणाले.

किरण मगरची प्रो-कबड्डीसाठी निवड! दत्तात्रय भरणेंकडून सत्कार
Jayant Patil : बिनखात्याचे मंत्रीच करतील ध्वजारोहण, खातेवाटपावरुन टीका