सरकार जरांगेच्या दबावात येऊ नये म्हणून ओबीसी समाजही आंदोलन करणार, प्रकाश शेंडगे यांचा इशारा

| Updated on: Dec 29, 2023 | 9:17 PM

मराठा समाजाने आरक्षण घेण्यासाठी सरकारशी आरपारची लढाई जारी करीत येत्या 20 जानेवारीला अंतरवली सराटीतून मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्याच वेळी आता ओबीसी समाजानेही महाराष्ट्रासह मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला मिळालेला निधी ओबीसीला जोपर्यंत मिळत नाही. जात निहाय गणना जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत शांत न बसण्याचा निर्णय ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतला आहे.

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 20 जानेवारीला अंतरवली सराटीतून मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी याच दरम्यान मुंबईसह राज्यभरात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने जरांगे यांच्या दबावाखाली येऊन मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये यासाठी हे आंदोलन केले जाईल असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ओबीसी नेते शेंडगे यांनी देखील आता आझाद मैदानात आंदोलन करण्याची मागणी केली आहे. दोनशे कोटीचे इंधन खर्च करून तीन कोटी मराठा गरीब समाज आंदोलन करीत असल्याने सरकार दबावाखाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हीही रस्त्यांवर उतरणार असल्याचे शेंडगे यांनी म्हटले आहे. ओबीसीचा मागास वर्गाचा अध्यक्षांना हाकलेले, ओबीसीचे सदस्य हाकलेले, त्या ठिकाणी मराठा समाजाचे सदस्य आणि अध्यक्ष नेमले, मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध करणाऱ्या समितीचे सदस्य सुनील शुक्रे यांनाच आता अध्यक्ष केले आहे. राज्य मागास वर्ग राहीला नसून मराठा आयोग झालेला आहे. आता चक्क मागासवर्गीयांचे निकषच बदलले आहेत. ही इंदिरा सहानी केस मध्ये ठरवून दिलेल्या या 11 निकषांना बदलण्याचा कोणालाच अधिकार नसल्याने आम्ही त्याला कोर्टात आव्हान देणार असल्याचे शेंडगे यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 28, 2023 08:47 PM