भाजपच्या आरक्षणाच्या जल्लोषात महागाईवरुन फटकारले
भाजप सरकार आल्यापासून महागाई प्रचंड वाढली आहे, त्याचा फटका आम्हाला बसत आहे, त्यामुळे आम्ही भाजपला मतदान केले असले तरी आता भाजपला मतदान करणार नसल्याचे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यानंतर अनेक ठिकाणी सर्वपक्षातून जल्लोष करण्यात आला, पुण्यात मात्र भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करताना भाजपच्याच महिलांनी महागाईवरून पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी महागाईबरोबरच बेरोजगारीचा मुद्दाही उपस्थित केल्यामुळे शाब्दीक चकमक उडाली. पुण्यातील दोन महिलांनी भाजपचा जल्लोष चालू असतानाच त्यांनी पदाधिकाऱ्यांना महागाईच्या मुद्यावरून सवाल उपस्थित केले मात्र त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला. यावेळी भाजपकडून त्या महिला काँग्रेसच्या असल्याची टीका केली. यावेळी त्यांनी सांगितले की, भाजप सरकार आल्यापासून महागाई प्रचंड वाढली आहे, त्याचा फटका आम्हाला बसत आहे, त्यामुळे आम्ही भाजपला मतदान केले असले तरी आता भाजपला मतदान करणार नसल्याचे सांगितले.
Published on: Jul 20, 2022 08:33 PM