मागास समाजाला प्रतिनिधित्व करायला मिळणार
राजकारणात मागास समाजाला आरक्षण मिळणार असल्याने त्याना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांनी प्रतिनिधित्व करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत अल्या आल्या त्यांनी अगदी ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक घेऊन त्याबाबतचे काम गतीने केल्याने राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाचे अभिनंदन करत ओबीसी आरक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी आरक्षणासाठी प्रयत्न केलेय त्यांचेही अभिनंदन यावेळी त्यांनी केले. राजकारणात मागास समाजाला आरक्षण मिळणार असल्याने त्याना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांनी प्रतिनिधित्व करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय आरक्षण जाहीर झालं असलं तरी आगामी निवडणुका या पावसाची परिस्थिती पाहूनच निवडणुकांचा निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितले.
Published on: Jul 20, 2022 08:18 PM