मुंबईकरांनो छत्र्या काढाच! हवामान खात्यानं वर्तवला हा अंदाज

| Updated on: May 04, 2023 | 8:39 AM

याचदरम्यान आता पुढील 48 तासात मुंबईकरांसाठी महत्वाचे ठरणार आहेत. मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळीने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अद्यापही अवकाळीनं मात्र काढला पाय घेतलेला नाही. ऐन एप्रिल- मे महिन्यातही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं झोडपणं सुरुच ठेवलं आहे. त्यामुळे अनेक पिंकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आता पुढील 48 तासात मुंबईकरांसाठी महत्वाचे ठरणार आहेत. मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. वीजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेल्या आंबा, काजू आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Published on: May 04, 2023 08:39 AM
अध्यक्ष निवडीवर सध्या बोलणं उचीत नाही; राऊत यांची राष्ट्रवादीवर सावध प्रतिक्रीया
शरद पवार यांच्या चरणाशी लोळण घातलेल्यांचा एक पाय भाजपात? ‘सामना’तून राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत मोठा दावा