पालकमंत्र्यांचे पालिकेत बस्तान, ठाकरे गट आक्रमक, घेणार आयुक्तांची भेट !
मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी खास कार्यालय दिले आहे. महापालिकेतील नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी हे दालन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मात्र यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.
मुंबई, 21 जुलै 2023| मुंबई महापालिकेत सर्व पक्षीय कार्यालय आणि समिती कार्यलय अनेक महिन्यापासून बंद आहेत. पक्ष कार्यालय बंद असताना मुंबई महापालिकेत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी खास कार्यालय दिले आहे. पालकमंत्री यांचे ‘नागरिक कक्ष’ कार्यालय अशी पाटी कार्यालयाबाहेर झळकते आहे. महापालिकेतील नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी हे दालन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून आज ठाकरे गटातील माजी नगरसेवक आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेणार आहेत. एकीकडे पक्ष कार्यालय बंद असताना पालकमंत्र्यांसाठी महापालिकेत कार्यालय कशाला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Published on: Jul 21, 2023 11:58 AM