Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन

| Updated on: Mar 04, 2024 | 1:43 PM

जुन्या वस्तूंचा संग्रह करणे अनेकांना आवडते. कोणी पोस्टाचा स्टॅंम्प तर कोणी जुन्या माचिसचे कव्हर, नाणी, फाऊंटन पेन जमा करीत असतात. नागपूरच्या रमण सायन्स सोसायटीने मात्र विण्टेज कारची भेट घडविली आहे. या प्रदशर्नात मांडलेल्या विण्टेज कार पाहून तरुणांच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहेत.

नागपूर | 4 मार्च 2024 : नागपूरातील रमण सायन्स सेंटरने जुन्या विण्टेज कारच्या शौकीनांसाठी कार आणि बाईकच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात जुन्या क्लासिक कार आणि बाईकच्या दर्दी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे. या प्रदशर्नाला 25 ते 35 वयोगटातील तरूण- तरुणी भेट देत आहेत. या प्रदर्शनात फॉक्सवॅगनपासून ते मर्सिडीज पर्यंच्या जुन्या कारची 1936 ते 1970 पर्यंत मॉडेल चाहत्यांसाठी ठेवली आहेत. यात एक फॉक्सवॅगन कार आहे जिचे डीक्की पुढे आहे आणि इंजिनपाठी मागे आहे. तसेच बीएमडब्ल्यूची बाईक देखील प्रदर्शनात ठेवली आहे. या कार हल्लीच्या पिढीला केवळ जुन्या चित्रपटात पाहायला मिळतील त्या कारना प्रत्यक्षात पाहून तरुण पिढी अवाक झाली आहे.

Published on: Mar 04, 2024 01:40 PM
Video | ‘प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा…,’ काय म्हणाले संजय राऊत
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांनी लिहीले फडणवीसांना पत्र