अतिवृष्टीचा मुंबई-पुणे जुन्या महार्गाला फटका; अनेक भागात पाणी ही साचलं? कुठं नेमकं घडतयं असं?
दडी मारलेल्या पावसाने गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात आपली हजेरी लावत बळीराज्याला चिंतेतून मुक्त केलं आहे. पण महिनाभर दडी मारल्यानंतर पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे.
खोपोली (रायगड) : दडी मारलेल्या पावसाने गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात आपली हजेरी लावत बळीराज्याला चिंतेतून मुक्त केलं आहे. पण महिनाभर दडी मारल्यानंतर पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे. कोकणात पावसाने तर सगळीकडे पाणीच पाणी करून सोडलं आहे. सलग आणि जोरदार पावसाचा फटका आता बसताना दिसत आहे. खोपोलीत देखील पावसामुळे मुंबई-पुणे जुन्या महामार्गाला फटका बसला आहे. येथे पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. ज्याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. तर पाणी साचल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Published on: Jul 01, 2023 07:24 AM