‘त्यांना’ जमतं तर काहीतरि मार्ग असणार; अजित पवार यांनी सरकारला घेरलं
सध्या या संपामुळे विद्यार्थ्यांचे, रूग्णांचे हाल होत आहेत. कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची नितांत गरज राज्याच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने आहे त्यामुळे ताबडतोब या संपावर मार्ग निघावा
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत राजव्यापी संप पुकारला आहे. देशातील राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, झारखंड आणि हिमाचल प्रदेश सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे त्या राज्यांना जमत असेल तर महाराष्ट्राला का जमत नाही असा थेट सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावरूनच सरकारला घेरताना जर त्या राज्यांना हे जमत असेल तर यात काहीतरी मार्ग असणारच की. कुठल्याही राज्यकर्त्यांना निर्णय घेताना सगळा विचार करून घ्यावा लागतो. तसा विचारपूर्वक निर्णय घ्या. सध्या या संपामुळे विद्यार्थ्यांचे, रूग्णांचे हाल होत आहेत. कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची नितांत गरज राज्याच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने आहे त्यामुळे ताबडतोब या संपावर मार्ग निघावा अशी आमची विरोधी पक्ष म्हणून भूमिका असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.