जुन्या पेन्शन योजनेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संप मागे घ्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बाजू मांडताना, सरकार सकारात्मक चर्चा करण्यास तयार आहे. पण आधी हा संप मागे घ्यावा, अशी विनंती कर्मचारी संघटनांना केली आहे
मुंबई : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यात मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर याच्याआधी झालेल्या बैठकीत यावर तोडगा निगाला नसल्याने संपाचे हत्यार संघटनांनी उगारत बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे थेट रूग्णांवर परिणाम होत असून काही ठिकाणी शस्त्रक्रिया पुढेही ढकलण्यात आल्या आहेत. याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बाजू मांडताना, सरकार सकारात्मक चर्चा करण्यास तयार आहे. पण आधी हा संप मागे घ्यावा, असे आवाहन कर्मचारी संघटनांना केली आहे. यासंदर्भात एक सूत्र ठरवून काम केलं जाईल. सरकारने निर्णय घेईपर्यंत जे लोक निवृत्त होत आहेत. त्यांचाही सरकार विचार करेल. पण चर्चेतून मार्ग काढला पाहीजे. अत्यावश्यक सेवा बंद पाडून लोकांची गैरसोय करू नये. चर्चेतून मार्ग निघतो. सरकार चर्चेला तयार आहे.