राज्यभरातील कर्मचारी संपाचा आज तिसरा दिवस; पुणे महापालिकेतील परिस्थिती काय? पाहा…

| Updated on: Mar 16, 2023 | 1:56 PM

Pune Mahapalika Employees Strike : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत. पुणे महानगरपालिकेच्या कामकाजावरही या संपाचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय. पाहा व्हीडिओ...

पुणे : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर गेले आहेत. 18 लाख सरकारी कर्मचारी सध्या संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आजही संपावर आहे. पुणे महानगरपालिकेच्या कामकाजावरही या संपाचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय. तीन दिवसापासून पुणे महापालिकेचा कारभार ठप्प आहे. कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे पुणे महापालिकेत शुकशुकाट पाहायला मिळतोय. पुणे महापालिकेत फक्त अधिकारी हजर आहेत. तर कर्मचारी मात्र संपावर आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 32 विभागातील कर्मचाऱ्यांनी सध्या सं पुकारला आहे. एकूण 68 हजार कर्मचारी सध्या संपावर आहेत.

Published on: Mar 16, 2023 01:55 PM
जातीच राजकारण करत आमचं खच्चीकरण केलं; भुजबळांवर नाशिकमधूनच हल्ला
40 वर्षे जुन्या मागण्या, शेतकऱ्यांनी लगेच पूर्ण करण्याचा आग्रह धरू नये; शिंदेगटातील नेत्याचं वक्तव्य