जीवन-मरणाच्या दरम्यान नर्सिंग कॅालेजचे विद्यार्थी
नागपुरचा विचार केल्यास सुमारे 1100 पेक्षा जास्त नर्सेस संपावर गेल्या आहेत. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवर होतोय.
नागपूर : राज्यात जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून सुमारे 18 लाख कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम शासकीय कामांसह आरोग्य व्यवस्थेवर पडला आहे. नागपुरचा विचार केल्यास सुमारे 1100 पेक्षा जास्त नर्सेस संपावर गेल्या आहेत. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवर होतोय. मात्र जीवन-मरणाच्या दरम्यान नर्सिंग कॅालेजचे विद्यार्थी उभे असून ते या संपाची तीव्रता कमी करण्यासाठी रूग्णसेवा देत आहेत. गरजू रुग्णांना उपचार मिळाला म्हणून आरोग्य विभागाने खाजगी नर्सिंग कॉलेजला पत्र देत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची मागणी केली होती. त्याप्रमाणे वासनिक नर्सिंग कॉलेजची जवळपास 35 विद्यार्थी हे रूग्णसेवा देण्याचे काम करत आहेत.
Published on: Mar 15, 2023 11:18 AM