शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकारीही कंत्राटी; राज्य सरकारकडून हालचाली सुरू

| Updated on: Mar 15, 2023 | 9:31 AM

राज्यसरकारकडून शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकाऱ्यांपर्यंतची पदे थेट खासगी एजन्सीच्या माध्यमातून भरण्याच्या हालताची सुरू झाल्या आहेत

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यातील 18 लाख कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. त्याचा अनेकांना फटका बसताना पहायला मिळत आहे. याचदरम्यान राज्य सरकारकडून शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकाऱ्यांपर्यंतची पदे थेट खासगी एजन्सीच्या माध्यमातून भरण्याच्या हालताची सुरू झाल्या आहेत. राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर ९ एजन्सीजच्या माध्यमातून सरकारी, निमसरकारी अस्थापने, महामंडळांत १३६ प्रकारची पदे भरली जाणार आहेत. तर प्रशासनातील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी बाह्ययंत्रणेमार्फत कामे करून घेण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

Published on: Mar 15, 2023 09:07 AM
संपाचा फटका, नागपुरात 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
पुण्यातील धायरी परिसरात केमिकल कंपनीला भीषण आग; पाहा व्हीडिओ…