31 डिसेंबरला राज्यातील अनेक मंदिरे दर्शनासाठी 24 तास खुली रहाणार

| Updated on: Dec 30, 2023 | 9:19 PM

नवीन वर्षांची सुरुवात देवदर्शनाने करण्याची प्रथा असते. त्यामुळे राज्यातील महत्वाची देवस्थाने नववर्षाच्या स्वागतासाठी खुली ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. नव वर्षांच्या पार्श्वभूमीवर देवदर्शन घेणाऱ्या भाविकांची गैर सोय होऊ नये म्हणून हा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई | 30 डिसेंबर 2023 : नववर्षांच्या स्वागतासाठी राज्यातील महत्वाची मंदिर खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव वर्षांच्या सुरुवातीला भाविकांना देवाचे दर्शन घेता यावे यासाठी राज्यातील महत्वाची देवस्थाने 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. शिर्डी साई मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाईचे मंदिर, पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना देवदर्शन घेता येणार आहे. शिर्डी साईमंदिर 31 तारखेला 24 तास खुलं राहील, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत अंबाबाईच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे. तुळजा भवानीचं मंदिर रात्री 11 वाजेपर्यंत खुलं रहाणार आहे. 1 जानेवारीला रात्री 1 वाजल्यापासून दर्शन करता येणार आहे. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर रात्री 11 पर्यंत खुलं रहाणार आहे. शेगाव मधील गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं रहाणार आहे. नाशिकचं सप्तश्रृंगी मंदिर 31 तारखेला 24 तास खुलं राहील.

Published on: Dec 30, 2023 09:19 PM
आज शेतकऱ्यांकडे ढुंकून बघायलाही सरकार तयार नाही – शरद पवार
फडणवीसांच्या वजनाने बाबरीचा ढाचा खाली आला असावा-उद्धव ठाकरे यांची खोचक टीका