संभाजी राजे कडाडले, ‘लोकांच्या भावनांशी खेळू नका, जमत नसेल तर…
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु झाल्यावर सरकारला जाग आली का? त्यांची काळजी सरकारने घ्यावी. आता सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. हे सरकारला आधी सुचल नाही? ही सर्वपक्षीय बैठक आधी का घेतली नाही?
मुंबई : 11 सप्टेंबर 2023 | मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्यसरकारने सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीसाठी छत्रपती संभाजी देखील उपस्थित होते. मात्र, अवघ्या १५ मिनिटांमध्ये बैठकीमधून छत्रपती संभाजी बाहेर आल्याने चर्चा सुरु झाली. यावर छत्रपती संभाजी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडून बाहेर आल्याचे सांगितले. ‘मराठा समाजाला खूश करण्यासाठी सरकारने जीआर काढला. पण, तो न्यायालयात टिकला नाही तर ते योग्य होणार नाही. केंद्र आणि राज्यात त्याचे सरकार आहे. त्यामुळे न्यायिक बाजूत जर हे आरक्षण बसत असेल तर लगेच देवून टाका. आरक्षणासाठी 49 जणांनी जीव दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ते जर कायदेशीरपणे बसत असेल तर सरकारने यावर आपली स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांचा खेळ यापुढे करु नका, अशा शब्दात संभाजीराजे यांनी सरकारवर टीका केली.