विरोधकांच्या पत्रातलं एक वाक्य जरा मनोरंजनासारखे, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

| Updated on: Feb 25, 2024 | 8:25 PM

आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करीत आहेत. विकासाची कामे वेगाने सुरु आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्ते, धरणे यांची कामे करीत आहोत. धनाला बोनस जाहीर केला होता. त्यासंदर्भात आज निर्णय घेतल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्याचे आभार मानतो असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Follow us on

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : उद्यापासून ( सोमवार26 फेब्रुवारी ) राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. तत्पूर्वी पूर्व संध्येला विरोधकांना चहापानावर बहिष्कार घातला. या चहापानानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटे काढले. विरोधक इतके निराशेत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याना लिहीलेल्या पत्रात कुठला विषय मांडावा हे देखील त्यांना कळेनासे झाले आहे. या पत्रात अंतिम आठवडा प्रस्तवाचा मसूदा दिला आहे. त्यातील एक वाक्य मनोरंजन करणारे आहे. या पत्रात लिहीलंय की सभांमध्ये अर्वाच्य भाषा, शिवीगाळ यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागतेय. आता हे पत्र आमच्यासाठी लिहिलेय की सकाळी रोज 9 वाजता जे पत्रकार परिषद घेतात, त्यांना लिहिलंय? हा माझा पहिला प्रश्न आहे. ते रोज जी अर्वाच्य भाषा वापरात..कुठले कुठले शब्द वापरतात. एवढी जर महाराष्ट्राच्या संस्कृतीची जर एवढीच चिंता असेल, तर विरोधकांना त्यांनी एक पत्र द्यावे असा टोला लगावला आहे.