अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामतीत पार पडली ऑफ रोड ड्रायव्हिंग स्पर्धा

| Updated on: Jul 24, 2022 | 8:32 PM

बारामती तालुक्यातील गडदरवाडीत या ऑफ रोड ड्रायव्हिंग स्पर्धेचे आयोजन अभिजित काकडे मित्रपरिवाराने केलं होतं. यावेळी राज्यातील विविध भागांतील स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

बारामती : बारामती(Baramati) तालुक्यात ऑफ रोड ड्रायव्हिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं.  विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या वाढदिवसाच्या(Ajit Pawar’s birthday) निमित्ताने हे आयोजन करण्यात आलं होतं. बारामती तालुक्यातील गडदरवाडीत या ऑफ रोड ड्रायव्हिंग स्पर्धेचे आयोजन अभिजित काकडे मित्रपरिवाराने केलं होतं. यावेळी राज्यातील विविध भागांतील स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. बारामती तालुक्यात पहिल्यांदाच ऑफरोड कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चित्तथरारक अशी स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Published on: Jul 24, 2022 08:32 PM
Ramdas Kadam : रामदास कदम-शिवसैनिकाची ऑडिओ क्लीप व्हायरल, रामदास कदम शिवसैनिकावर भडकले
साहेब तुम्ही असं का केल? शिंदे गटाचे आमदार संदिपान भुमरे यांना शिवसैनिकाचा फोन; ऑडिओक्लीप व्हायरल