जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर अजित पवार यांनी का बर व्यक्त केली खंत
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र आपली खंत बोलून दाखवली. राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात न आल्याने त्यांनी सरकारला फटकारत राज्य सरकारचे वाभाडेच काढले
मुंबई : आज अख्या जगात जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम केले जात आहेत. महिलांचा सन्मान केला जात आहे. याचदरम्यान महिला दिवसानिमित्त अधिवेशनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा पत्र, गुलाबाचे फूल आणि चॉकलेटचे वाटप केले. तसेच महिलांचं मनोबल वाढवण्याचे काम सध्या विधान भवनात होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र आपली खंत बोलून दाखवली. राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात न आल्याने त्यांनी सरकारला फटकारत राज्य सरकारचे वाभाडेच काढले. एवढा मोठा महाराष्ट्र पण जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला मंत्री नसणे हे कमीपणाचं असून महाराष्ट्राच्या सरकारला ते शोभत नसल्याचे ते म्हणाले.
Published on: Mar 08, 2023 11:23 AM