Annabhau Sathe Jayanti 2023 | 103 वी जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा, त्यांच्या घरातून….
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट 1920 साली झाला. वाटेगाव या छोट्याशा गावातून आपली जीवनाची सुरुवात केली. अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईला जाऊन कलापथकाच्या माध्यमातून आपल्या पहाडी आवाजातून शाहिरीच्या माध्यमातून लोकांना जागृत केलं.
सांगली, 01 ऑगस्ट 2023 | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 103 वी जयंती आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या सांगलीतील वाटेगाव या गावात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर आज त्यांच्या 103 वी जयंतीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव उर्फ केसीआर हे अभिवादन करण्यासाठी सांगलीत येत आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट 1920 साली झाला. वाटेगाव या छोट्याशा गावातून आपली जीवनाची सुरुवात केली. अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईला जाऊन कलापथकाच्या माध्यमातून आपल्या पहाडी आवाजातून शाहिरीच्या माध्यमातून लोकांना जागृत केलं. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक चळवळीत ही अण्णांनी सहभाग घेतला होता. अनेक कथा, कादंबऱ्या, पोवाडे, नाटक असं साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलं. त्यांची फकीरा ही कांदबरी गाजली होती. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आज 103 वी जयंतीनिमित्त त्यांच्या मुळ गावातून घरातून जीवनप्रवासावर प्रकाश टाकला आहे.