विक एंडचा आनंद लुटण्यासाठी निघताय तर आधी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक अपडेट घ्याच

| Updated on: Jun 10, 2023 | 9:51 AM

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर देखील असतील. पण याचाच वापर अनेकांना करावा लागत असल्यानेच येथे वाहतूक संथगतीने होताना कायम दिसत. आताही येथे काही असाच प्रकार सुरू आहे. विकेंड आल्यामुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

बोरघाट, लोणावळा : विकेंडसाठी लोणावळा, महाबळेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी अनेकांनी प्लँन ठारवलेला असेल. त्यासाठी लगबगीनं पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर देखील असतील. पण याचाच वापर अनेकांना करावा लागत असल्यानेच येथे वाहतूक संथगतीने होताना कायम दिसत. आताही येथे काही असाच प्रकार सुरू आहे. विकेंड आल्यामुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसतायेत. तर विक एंडचा आनंद लुटण्यासाठी आणि आपापल्या गावी जाण्यासाठी मुंबईकर बाहेर पडलेत, परिणामी द्रुतगती मार्गावर ताण पडलेला आहे. दरम्यान काल रात्री ही अशीच वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. तर आता बोरघाटात महामार्ग पोलिस रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

Published on: Jun 10, 2023 09:51 AM
Biperjoy Cyclone : अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता; कोकणातील किनारपट्टी जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पुण्याच्या वेल्हा तालुक्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपले; रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप