पडळकरांवर आणखीन एक नवा आरोप, प्रकरण न्यायालयात असतानाच…बेकायदेशीर
ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत काही लोकांनी मिरजमधील 4 हॉटले पाडली. त्यावरून आता मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले. त्यानंतर याप्रकरणी ब्रह्मानंद पडळकरांसह 100 जणांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला
मिरज : सांगलीतील मिरजमध्ये पाडण्यात आलेल्या 4 हॉटेल्सवरून भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे अडचणीत येण्याचे चिन्ह दिसत आहे. हॉटेल्स पाडल्याप्रकरणी ब्रह्मानंद पडळकरांसह 100 जणांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर तेथे वापरण्यात आलेली 4 जेसीबी मशिनही जप्त करण्यात आली आहेत. यानंतर आता आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर देखिल आरोप करण्यात येत आहेत.
ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत काही लोकांनी मिरजमधील 4 हॉटले पाडली. त्यावरून आता मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच ब्रह्मानंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे पोलीसांनी ब्रह्मानंद पडळकरांसह 100 जणांवर गुन्हा दाखल केला आहे
याचदरम्यान आता विष्णू लामदाडे या व्यक्तीने आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर आपोर केला आहे. तसेच त्याने आमदार पडळकरांनी बेकायदेशीर पद्धतीने त्यांची जमीन खरेदी केल्याचा आरोप केला आहे. तर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही पडळकरांनी त्यांची जमीन ताब्यात घेतली असेही त्याने म्हटलं आहे.