जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार. शेतकऱ्यांच्या अवजारांवरील जीएसटी बंद करणार अशा अनेक गोष्टी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत केल्या आहेत.
इंडिया आघाडीने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज संपणार आहे. अशातच आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अनेक महत्वाच्या योजना लोकांसमोर मांडल्या आहेत. कर्नाटकात सुरु केलेली गॅरंटी देशभर देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या अवजारांना केंद्र शासनाने लावलेला जीएसटी बंद करणार. तसेच २५ लाखांचा आरोग्य विमा देणार. 30 लाख जागांवर भरती करणार. मनरेगाच्या धर्तीवर शहरातील लोकांना रोजगार देणार आहे. बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देणार आहे. तसेच वर्षाला एक लाख रुपये स्टायपेंड देणार असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Published on: May 18, 2024 01:06 PM