एक वाघ, शेकडो गावकरी, बारा तास प्रयत्न, अखेर… कुठे घडली हि घटना

| Updated on: Feb 16, 2023 | 9:45 AM

एकाच ठिकाणी बारा ठिय्या मांडून बसल्यानंतर अखेर त्याने आपला मुक्काम हलवला. इतके प्रयत्न करूनही हरलेल्या गावकऱ्यांनी अखेर वाघच तो ! असे म्हणत आपापले घर गाठले.

भंडारा : शेतात घुसलेल्या एका वाघाला हुसकावून लावण्यासाठी शेकडो गावकरी जमले. पण त्या वाघाला त्याच्या जागेवरून कुणी टिचभरही हलवू शकले नाही. एकाच ठिकाणी बारा ठिय्या मांडून बसल्यानंतर अखेर त्याने आपला मुक्काम हलवला. इतके प्रयत्न करूनही हरलेल्या गावकऱ्यांनी अखेर वाघच तो ! असे म्हणत आपापले घर गाठले. तुमसर व मोहाडी तालुक्यातील अनेक गावांत वाघाच्या हजेरीने नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. अशातच सुकळी – रोहा परिसरात हरणाची शिकार करण्यासाठी आलेल्या वाघाने शेतातच ठाण मांडली. त्याला हुसकावून लावण्यासाठी गावकरी, वनविभागाचे विशेष पथकाचे प्रयत्न सुरु होते. पण, त्यांना अपयश आले. बारा तासानंतर त्याचे गुरगुरणे कमी झाले तेव्हा शोध घेतला असता तो शेतातुन निघून गेल्याचे निष्पन्न झाले.

जितेंद्र आव्हाड यांचं पोलिसांना भावनिक पत्र; उद्विग्न होत म्हणाले…
उद्धव ठाकरे गटाची ‘ती’ मागणी मान्य होणार का? काय होणार आज सर्वोच्च न्यायालयात ?