tv9 Special report | …कांदा शेतकऱ्याला हात देत असतानाच…; निर्यात बंदीने केला वांदा;
मागच्या काही दिवसापासून शेत मालाला चांगेल भाव मिळत आहेत. टोमॅटो, कोतमिर आणि मिर्चीचे भाव चढे होते. ज्यामुळे शेतकरी थोडा फार सुखावला होता. कारण कांद्याला भावच मिळत नव्हते. मात्र आता कांद्यालाही चांगले भाव येत असतनाच केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर निर्णय घेतला. ज्याला शेतकरी विरोध करत आहेत.
मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | मधल्या काळामध्ये कांद्याला भावच मिळत नव्हता. त्यामुळे कांदा उत्पादन मेटाकूटीला आला. तर टोमॅटोने मध्यंतरी शेतकऱ्याला दोन पैसे मिळवून दिले. यानंतर आता कांदा उत्पादकासाठी चांगले दिवस येतील असं वाटतं होतं. कांद्याला दोन पैसे भाव मिळत असतानाच आता केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर मोठा निर्णय घेतला. ज्याला शेतकरी विरोध करत आहेत. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्याने सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. तर सरकारच्या या निर्णयाला विरोध का होतोय? त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
Published on: Aug 21, 2023 08:47 AM