खुलताबाद सुलतानपूरच्या शेतकऱ्याचा सय्यमाचा बांध फुटला; शेतकऱ्याने केलं अस काही की सगळा कांदा…
तर जो कांदा टिकला त्याला बाजारात बावच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी याच मुद्यावरुन चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. मात्र यातून सरकारला जाग येताना दिसत नाही.
औरंगाबाद : कांद्याने (Onion) शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. अवकाळी पाऊसाचा फटका बसल्याने कांद्याचं चांगलचं नुकसान झालं आहे. तर जो कांदा टिकला त्याला बाजारात बावच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी याच मुद्यावरुन चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. मात्र यातून सरकारला जाग येताना दिसत नाही. तर सोलापूरात तर शेतकऱ्याला आपल्याच मालाला खपवल्यानंतर दमडिही मिळाली नाही. उलट 900 रूपये अडत्याला देण्याची वेळ आली. तर एकाने तर 2 ट्रॉल्या कांदा रस्त्याच्या कडेला नेऊन ओतला, असे चित्र राज्यात असतानाच आता खुलताबाद सुलतानपूरच्या शेतकऱ्याचा एक व्हीडिओ समोर येत आहे. या वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने तीन टन कांद्यावर जेसीबी फिरवला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने हे पाऊल उचललं आहे.
Published on: May 25, 2023 12:59 PM