ऐन पावसाळ्यात ‘या’ जिल्ह्यात अनेक गावांमध्ये आजही पाणीटंचाई, धरणात राहिला केवळ 24% जलसाठा
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे अनेक विहिरी अधिग्रहीत करण्यात आले असून तीव्र पाणी टंचाई संदर्भातला आराखडा ही प्रशासनाकडून तयार करण्यात आलेला आहे.
धुळे, 31 जुलै 2023 | राज्यातील कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक धरणे ही ७० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. त्यामुळे येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र धुळे जिल्ह्यामधील धरणांमधे जलसाठा केवळ 24% शिल्लक राहिलेला आहे. जुलै महिना संपायला आला तरी जलसाठ्यांमध्ये वाढ झाली नाही. गेल्या वर्षी दुप्पट जलसाठा जिल्ह्यातील धरणांमध्ये होता. मात्र यावर्षी पुरेसा पाऊस पडत नसल्याने धरणांचा पाणी साठा वाढण्याऐवजी तो झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील सोनवद आणि अमरावती धरणाचा पाणीसाठा तर शून्य वर आलेला आहे. तर अनेक धरणांमध्ये जलसाठ्याची पातळी ही सरासरी 20 टक्क्यांपर्यंत खाली आलेले आहे. जिल्ह्यामध्ये एकमेव जामखेली प्रकल्प हा 100% भरला असून, उर्वरीत मध्यम प्रकल्पांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सध्या येथील धरणांमध्ये 24 टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे अनेक विहिरी अधिग्रहीत करण्यात आले असून तीव्र पाणी टंचाई संदर्भातला आराखडा ही प्रशासनाकडून तयार करण्यात आलेला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येणारा वर्ष हे बिकट राहणार आहे. प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याच आवाहन केल आहे.