भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ

| Updated on: Dec 29, 2024 | 5:54 PM

निवडणूक आयोग केंद्र सरकारने नेमलेल्या शिपायासारखे काम करीत आहे. तर सर्वोच्च न्यायालय अतिशय भेदरलेले आणि दबलेल्या अवस्थेत आहे. मात्र या सर्वांवर कोणी ना कोणी मात करायला हवी, त्यामुळे मी या विरोधात लढणार आहे. लोकमत नसल्याचे सरकार चार महिन्यात जमीनदोस्त झाल्याचे तुम्हाला दिसेल असेही आमदाराने म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाने सर्वांना बुचकळ्यात टाकले होते. या संदर्भात अनेकांनी संशय व्यक्त केला होता. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी या विधानसभा निकालांचा अभ्यास करुन नवा दावा केला आहे. माळशिरस येथील मारकडवाडीत राष्ट्रवादीचे विजयी आमदार उत्तम जानकर यांना अपेक्षित लीड न मिळाल्याने या ग्रामपंचायतील अभिरुप पद्धतीने बॅलेटवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतू प्रशासनाने हा प्रयत्न होऊ दिला नाही. त्यानंतर आता निवडणूक आयोगात जाण्याची भूमिका जानकर यांनी घेतली होती. विधानसभेच्या १५० मतदार संघात गडबड झालेली आहे.बारामतीत अजित पवार हे सुद्धा २० हजार मतांनी पराभूत झालेले आहेत. भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेले आहेत. महायुतीला केवळ १०७ जागा मिळालेल्या आहेत असाही दावा जानकर यांनी केला आहे. अजितदादांचे केवळ १२ आमदार तर एकनाथ शिंदे १८ आमदार, तर भाजपाचे ७७ आमदार निवडून आलेले आहेत. अशी सगळी मिळून त्यांची संख्या १०७ इतकीच आहे. आणि दोन तीन अपक्ष अशी ११० संख्या त्यांची होते. आपण जयकुमार गोरे यांचा १३ हजार मतांनी पराभव झालेला आहे. तांत्रिकदृष्ट्या मी अभ्यास केला आहे. व्हीव्हीपॅटमधून जी चिट्टी येते, ती खाली जाते ज्याला काळी ग्लास लावली जाते ती चिट्टी आमच्या हाती यावी, तुम्ही प्रिंट केलेली चिट्टी आमच्या हाताने त्यात टाकली जावी म्हणजे पारदर्शकता येईल असेही जानकर यांनी म्हटले आहे.

 

Published on: Dec 29, 2024 05:53 PM
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, मोर्च्यापूर्वी संतोष देशमुख यांच्या कन्येने केली मागणी