मतदान पेटीत फक्त आणि फक्त मीच, निकालापूर्वीच उमेदवाराचा विजयाचा दावा, फैसला लवकरच
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीला काही तास उरले आहेत. काही वेळातच निकाल जाहीर होतील. अशातच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
नाशिक : ही जनतेची निवडणूक आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती. मतदाराला आतून इतका विश्वास होता की ही ही निवडणूक त्यानेच हातात घेतली होती. प्रत्येक जनता मला थांबवून काही न काही देत होती. हे पाहून मला स्वातंत्र्य काळाची आठवण येत होती.
मी लोकांचे प्रश्न सोडवत आली आहे. संघर्षाचा वारसा सांगत आली आहे. त्यामुळे त्यामुळे मला विश्वास आहे की मीच निवडणुकीत जिंकून येईल. कमी मतदानाचा फटका बसणार नाही. ज्यांना मत दयायचे होते ते आले. महिलांचे मतदान जास्त झाले. मतमोजणी ही फक्त formality बाकी आहे. पण, मतदान पेटित फक्त आणि फक्त शुभांगी पाटील दिसतील, असा दावा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी केला आहे.
Published on: Feb 02, 2023 09:31 AM