.. त्यांची कोणत्या विषयावर नाराजी आहे, हे त्यांच्या हायकमांडलाच माहीत- संजय राऊत
त्यांची कोणत्या विषयावर नाराजी आहे, हे त्यांच्या हायकमांडलाच माहीत. मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते यांच्यात नेहमी चर्चा होत असते. त्यामुळे वेगळे काही होत असेल तर त्यातून मार्ग निघतो. दिल्लीतील हायकमांड आणि मुख्यमंत्री यांच्यात चांगलीच चर्चा होत असते.
मुंबई – आम्ही आमचा उमेदवार उतरवलेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही खात्री आहे, की जेवढी मते हवी आहेत तेवढी मते शिवसेनेकडे (Shivsena) आहेत. आघाडीतील इतर उमेदवारदेखील विजय होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी नाराज असलेल्या काँग्रेसवरही (Congress)त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, की नाराजीबद्दल मी बोलणार नाही. त्यांची कोणत्या विषयावर नाराजी आहे, हे त्यांच्या हायकमांडलाच माहीत. मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते यांच्यात नेहमी चर्चा होत असते. त्यामुळे वेगळे काही होत असेल तर त्यातून मार्ग निघतो. दिल्लीतील हायकमांड आणि मुख्यमंत्री यांच्यात चांगलीच चर्चा होत असते, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)असे नेते आहेत, की ज्यांच्यावर कोणतेही दबावतंत्र नसते, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
Published on: May 30, 2022 05:31 PM