‘हे सरकार घटनाबाह्य आणि कलंकित’ असं म्हणत विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

| Updated on: Jul 17, 2023 | 9:20 AM

याचबरोबर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची विधान भवनात बैठक पार पडली. यावेळी या सरकारविरोधात लढण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी करताना, विरोधकांची संख्या कमी असली तरी सरकारला सळो की पळो करून सोडू, असा निर्धार विरोधकांनी केला आहे.

मुंबई, 17 जुलै 2023 | अजित पवार यांनी राष्ट्रवादीबरोबर फारकत घेत सरकारमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांच्या सरकारमधील उपस्थितीनंतर हे पहिलेच पावसाळी अधिवेशन होणार आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन आज पासून सुरू होत असून विरोधकांनी काल बोलवलेल्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. याचबरोबर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची विधान भवनात बैठक पार पडली. यावेळी या सरकारविरोधात लढण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी करताना, विरोधकांची संख्या कमी असली तरी सरकारला सळो की पळो करून सोडू, असा निर्धार विरोधकांनी केला आहे. यावेळी हे सरकार घटनाबाह्य आणि कलंकित असून शेतकरी, महिला, युवाविरोधी काम या सरकाने केल्याचा घणाघात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर याच बैठकीय फोडाफोडीच्या राजकारणात विकास मागे पडतोय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

Published on: Jul 17, 2023 09:20 AM
ठाकरे गटाचा मोठा निर्णय, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अन् बजोरिया यांना अपात्र करा; विधीमंडळ सचिवांना लिहिलं पत्र
उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढणार? 6 ते 7 आमदार शिंदे गटात जाणार, ‘या’ मंत्र्याचा मोठा दावा