Eknath Khadse : दमानियांचा दावाच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने खोडून काढला; फक्त पवारांना बदनाम करण्यासाठी ‘हे’

| Updated on: Apr 13, 2023 | 7:48 AM

यावेळी खडसे यांनी, अजित पवार हे भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. आपले त्यांच्याशी बोलणे झालं आहे. ते कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही.

बुलढाणा : गेल्या काही दिवसांतील घडामोडीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याचे दिसत आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपासोबत जाणार म्हणत ट्विट केल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होईल अशी चर्चा सुरू झाली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी खडसे यांनी, अजित पवार हे भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. आपले त्यांच्याशी बोलणे झालं आहे. ते कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही. तरत्यांना बदनाम करण्यासाठी वारंवार अशा बातम्या दिल्या जात आहेत असा दावा त्यांनी केला आहे.

Published on: Apr 13, 2023 07:48 AM
Sushma Andhare : गद्दारी केली हे मात्र नक्की, मग कशासाठी?; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर निशाना
मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है!; आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर नितेश राणे यांचा पलटवार