अजित पवार याचं कोल्हापूरकरांना थेट आवाहन, तर घेतली सतेज पाटील यांची फिरकी; म्हणाले, बंटी म्हणू नका…

| Updated on: May 21, 2023 | 8:08 AM

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली. अजित पवार, हसन मुश्रीफ, सतेज पाटील एकाच व्यासपीठावर होते. यावेळी अजित पवार यांनी, पाटील यांना टोपणनावावरून चिमटे काढला.

कोल्हापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या स्पष्टोक्तेपणाबद्दल ओळखले जातात. तर ते कधी कोणाची फिरकी घेतील हे देखील सांगता येत नाही. त्यामुळेच त्यांच्या सभा आणि कार्यक्रम हे हटके फुलके होत असतात. त्याचीच प्रचिती कोल्हापूर येथे आली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली. अजित पवार, हसन मुश्रीफ, सतेज पाटील एकाच व्यासपीठावर होते. यावेळी अजित पवार यांनी, पाटील यांना टोपणनावावरून चिमटे काढला. अजित पवार म्हणाले, “मी कितीतरी वेळा सांगतोय की बंटीला आता बंटी म्हणणे बंद करा. बंटीला आता बंटी झालेत.” तर ऋतुराज पाटील यांचे नाव घेत हे नाव उच्चारताना किती मस्त वाटतयं बघा असं मिश्किल वक्तव्य केलं ज्यानंतर उपस्थितांत चांगलाच हस्या पिकाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Published on: May 21, 2023 08:08 AM
आता माळ राणात नाही तर येथे भरणार बैलगाडा शर्यती; खासदार अमोल कोल्हे यांची काय आहे मागणी?
Special Report : राज ठाकरे यांचं पुन्हा भाजपशी बिनसलं? उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी सोडून भाजप नवं टार्गेट? नेमकं कारण काय?