‘तुमचा दाभोलकर करू’ च्या बावनकुळे यांच्या स्टेटमेंटवर अजित पवार वर भडकले; म्हणाले ‘सरळ मान्य करा’

| Updated on: Jun 10, 2023 | 1:16 PM

धमकी देणारा हा भाजपचा अमरावतीतील कथित कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. पण यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू’ असं म्हणणं म्हणजे धमकी होत नाही असं म्हटलं होतं.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘तुमचा लवकरच दाभोलकर होणार’ अशी धमकी समाजमाध्यमावरून देण्यात आली होती. याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. तर धमकी देणारा हा भाजपचा अमरावतीतील कथित कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. पण यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू’ असं म्हणणं म्हणजे धमकी होत नाही असं म्हटलं होतं. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बावनकुळे यांना चांगलच सुनावलं आहे. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल ‘आम्ही तुमचा दाभोलकर करू’ म्हणजे काय करणार… दाभोलकर डॉक्टर होते म्हणून डॉक्टर करणार का? असा सवाल अजित पवार यांनी केला. तसेच शरद पवार यांच्याकडेही डॉक्टरेटची पदवी आहे. त्यामुळे बावनकुळेंनी मान्य केलं पाहिजे, आपल्या माणसाचं चुकलं आहे. हे होता कामा नये. महाराष्ट्राची संस्कृती सर्वांना सांभाळली पाहिजे.

Published on: Jun 10, 2023 01:16 PM
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई पोलिसांवर धर्मसंकट ! 116 कुटुंबियांनाच कसली नोटीस?
‘…तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा!’ शिवसेना नेत्यानं भाजपला डिवचलं