Ajit Pawar : चालू कार्यक्रमात लाईट गेल्याने अजित पवार अंधारात! पुण्यातील बालेवाडीमध्ये का केली लाईट? पाहा व्हिडीओ
बालेवाडीतील कार्यक्रमात अजित पवारांच्या बैठकीआधीच बत्ती गुल! आयोजकांची धावपळ, अखेर मोबाईल टॉर्चची मदत घेण्याची नामुष्की ओढावली, पाहा नेमकं घडलं तरी काय...
पुणे : पुण्यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत क्रीडा संघटकांची बैठक पार पडत होती. या बैठकीदरम्यान अचानक विजेचा खेळखंडोबा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पुण्यातील (Pune Ajit Pawar Video) या बैठकीत अचानक लाईट गेल्यामुळे अजित पवार हे अंधारातच बसून होते. त्याचं झालं असं, की विरोधी पक्षनेते अजित पवार बालेवाडी (Balewadi) स्टेडीअममध्ये आले होते. ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षही असलेल्या अजित पवार यांनी आगामी वर्षातलं क्रीडा धोरण नेमकं कसं असावं, यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. ठरल्याप्रमाणे बैठकीला ते हजरी झाले. पण बैठकीच्या आधीच लाईट गेली. त्यामुळे आयोजकांची एकच धावपळ उडाली. पाच ते दहा मिनिटं लाईट गेल्यानं मोबाईल टॉर्चची अखेर मदत घेण्याची नामुष्की ओढावली होती. पाच ते दहा मिनिटांच्या खोळंब्यानंतर पुन्हा लाईट आली आणि त्यानंतर नियोजनाप्रमाणे बैठक पुन्हा सुरु करण्यात आली.