‘नुसतं दाढीवर हात मारू नका? काम करा, मग मी तुमचं कौतुक करतो’; अजित पवार यांनी शिंदे यांना फटकारलं

| Updated on: Jun 22, 2023 | 8:20 AM

पुण्यात कोयता गँग मध्येच उठून बसते. लोकांच्या मालमत्तांची तोडफोड होत आहे. अनेक आत्महत्या होत आहेत. धावत्या लोकलमध्ये विद्यार्थीवर अत्याचार होतो, या घटना पुरोगामी महाराष्ट्राला छेद देणाऱ्या आहेत. तर पोलिसांवरच प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत.

मुंबई : सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजारा उडाल्याचे चित्र आहे. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात कोयता गँग मध्येच उठून बसते. लोकांच्या मालमत्तांची तोडफोड होत आहे. अनेक आत्महत्या होत आहेत. धावत्या लोकलमध्ये विद्यार्थीवर अत्याचार होतो, या घटना पुरोगामी महाराष्ट्राला छेद देणाऱ्या आहेत. तर पोलिसांवरच प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. पोलीस यंत्रणांना मोकळीक नाही. हस्तक्षेप वाढला आहे असे एकना अनेक बाबी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बोलून दाखवत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधताना, या सरकारला पोलिस म्हणजे त्यांचे कार्यकर्तेच, ते त्यांना तसंच राबवतात असा आरोप केला आहे. तर ही महाराष्ट्राच्या पुरोगामीतेला, लौकिकतेला शोभा देणारी बाब नाही असे खडेबोल सुनावले आहेत. त्याचबरोबर जर मी सरकारवर, शिंदेवर टीका केली की परत मी बोलतो अशी टीका होते. त्यामुळे तुम्ही नुसतीच दाडी कुरवाळत बसू नका? काम करा. मी तुमचं कौतुक करेन असंही अजित पवार म्हणाले.

Published on: Jun 22, 2023 08:20 AM
अजितदादांची इच्छा, विरोधी पक्षनेते पद नको; अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचंय का? पाहा स्पेशल रिपोर्ट…
“भ्रष्टाचाराविरोधात मोर्चाचे ठाकरे गटाचे लॉजिक काय?”, शिवसेनेच्या नेत्याची टीका