नाराजी ते सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीवर अजित पवार यांनी व्यक्त केलं थेट मत; म्हणाले, ‘यापुढेही मी…’

| Updated on: Jun 11, 2023 | 9:30 AM

त्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार काहीच न बोलता थेट निघून गेले. त्यावरून ते नाराज झाले, तर त्यांचे पंख शरद पवार यांनी छाटले अशा असे सुर येणे सुरू झाले.

मुंबई : शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार काहीच न बोलता थेट निघून गेले. त्यावरून ते नाराज झाले, तर त्यांचे पंख शरद पवार यांनी छाटले अशा असे सुर येणे सुरू झाले. यावरून आता अजित पवार यांनी थेट आपल्या मनातील सांगताना, मी सुप्रिया सुळेंची नियुक्तीवर मी अतिशय समाधानी आहे. तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची नियुक्ती करावी, हे मी स्वत: सुचवलं होतं. त्यामुळे नाराज वराज काही नाही. मला फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मी नेहमी सांगतो की, राज्य पातळीवरचे प्रश्न मला विचारा आणि राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न नको. ते राष्ट्रीय प्रवक्ते किंवा राष्ट्रीय नेत्यांना विचारा असंही अजित पवार म्हणाले.

Published on: Jun 11, 2023 09:30 AM
‘अजित पवार, छगन भूजबळ…’ भाजप नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष निवडीवरून निशाना
‘हेच का तुमचे….’, अमोल मिटकरी यांचा टि्वट करत भाजपच्या बड्या नेत्यावर निशाणा