अजित पवार यांच्या प्रवेशावर भाजप नेत्याचा खुलासा; म्हणाले, राजकारणात कधी काही घडू शकतं
शेलार यांनी स्पष्टीकरण देताना, केंद्रीय स्तरावर काय चर्चा चालली असेल ती सार्वजनिक करायची नसते. पण राजकारणात कधी काही घडू शकतं असं म्हणत गुगली टाकली आहे
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटींच्या चर्चांना उत आला. त्याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार हे थेट दिल्लीला गेल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर बावनकुळे हे राज्यात परतले तर शेलार हे थेट कर्नाटक निवडणुकीच्या रणांगणात गेले आहेत. त्यामुळे दिल्लीत नक्की काय झालं असा प्रश्न राज्यातील जनतेला सतावत आहे. यावरून शेलार यांनी स्पष्टीकरण देताना, केंद्रीय स्तरावर काय चर्चा चालली असेल ती सार्वजनिक करायची नसते. पण राजकारणात कधी काही घडू शकतं असं म्हणत गुगली टाकली आहे. तर भारतीय जनता पार्टी आणि शेलार हे कलपोकल्पित गोष्टी करण्यापेक्षी काँक्रीट गोष्टी करून दाखवण्यावर भर देत असतो असे ते म्हणाले.
Published on: Apr 19, 2023 08:11 AM