विरोधी पक्षनेते यांचा मोठा गौप्यस्फोट, भाजपचे लोक म्हणतात या 40 गद्दारांमुळे आमचे…

| Updated on: May 26, 2023 | 6:55 PM

औरंगाबादला मंत्रीपद मिळण हे लॉलीपॉप आहे. मुळात मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही हाच प्रश्न आहे. आजही त्या 16 लोकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद येथे सरकार जनतेच्या दारी जातंय. खरे आहे मात्र मागील वर्षभरात अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारने काय दिले तर भोपळा अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. सरकार आपल्या दारी उपक्रमासाठी तहसीलदार, तलाठी, सर्कल यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संजय शिरसाट यांनी खोके घेतले की नाहीत ते आधी सांगावे. या खोकेवाल्या आमदारांनी असं कुठे म्हटले का मी खोके घेतले नाहीत. खेड्यापाड्यातले लहान मुलं म्हणतायेत खोकेवाले आमदार चालले, गद्दार चालले. आधी याचे उत्तर द्या मग सैराटचा विचार करू. औरंगाबादला मंत्रीपद मिळण हे लॉलीपॉप आहे. मुळात मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही हाच प्रश्न आहे. आजही त्या 16 लोकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही. भाजपचे लोक आम्हाला खाजगीत म्हणतात की, या 40 गद्दारांमुळे आमचे काम होत नाहीत. त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या असेच मी म्हणेन. शिंदे गटाला 22 जागा सोडा दोन जागाही मिळणार नाहीत हे लिहून घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

Published on: May 26, 2023 06:55 PM
नवी इमारत, नवी आसन व्यवस्था, कसे असेल नवे संसद भवन, पहा पहिली झलक
पुण्यात लव्ह जिहाद, आमदार गोपीचंद पडळकर यांनी उजेडात आणले प्रकरण, सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका