Ambadas Danve : सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
Buldhana News : राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी होळीच्या दिवशी आत्महत्या केली होती. त्यानंतर आज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.
एका नावीन्य पूर्ण शेती करणाऱ्या तरुण शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे. खडकपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून जे पाणी वाया जातं ते 14 गावांना मिळावं यासाठी हा शेतकरी लढा देत होता. आणि त्यातून त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ यावी हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर आज नेते अंबादास दानवे यांनी या ठिकाणी जाऊन नागरे यांच्या परिवाराची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
Published on: Mar 27, 2025 04:21 PM