Ajit Pawar Live | स्वराज्यरक्षणात अनेक गोष्टी येतात, वादग्रस्त विधान माझं नाहीतर राज्यपालांचं

| Updated on: Jan 04, 2023 | 3:47 PM

आपण कधीच महापुरुष यांच्याबद्दल चुकीचं बोललो नाही. आपल्या विरोधात भाजपने आंदोलने केली. तसा त्यांना अधिकार नाही. तसेच आपल्या विरोधात बोलण्याचा आणि आंदोलनं करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचंही अजित पवार म्हणाले.

Follow us on

मुंबई : विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तसेच त्यांनी विधान सभेत केलेल्या वक्त्यावर आज स्पष्टीकरण दिलं. याचवेळी त्यांनी आपण चुकीचं विधान केलेलं नाही.तर जे बोललो आहोत त्यातही काहीही चुकीचं नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर स्वराज्यरक्षणात अनेक गोष्टी येतात असं म्हणताना, वादग्रस्त विधान आपण केलं नसून राज्यपाल यांनी केलं होतं असेही अजित पवार म्हणाले.

तर आपण कधीच महापुरुष यांच्याबद्दल चुकीचं बोललो नाही. आपल्या विरोधात भाजपने आंदोलने केली. तसा त्यांना अधिकार नाही. तसेच आपल्या विरोधात बोलण्याचा आणि आंदोलनं करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचंही अजित पवार म्हणाले.

इतकच काय, तर आपण वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. राज्यपाल, भाजपचे मंत्री, प्रवक्ता यांनी केलेलं आहे. त्यानंतर सभागृहात हा विषय आपण मांडला. त्यानंतरच दोन दिवसानंतर विरोध व्हायला सुरुवात झाल्याचेही ते म्हणाले. पण जे माझ्या विरोधात आंदोलनात करतात त्यांनी राज्यपाल आणि भाजप मंत्र्यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असंही ते म्हणालेत.