CM Eknath Shinde | ‘मी कंत्राटी मुख्यमंत्री, राज्याला पुढे नेण्याचं कंत्राट घेतलं’- tv9

| Updated on: Aug 25, 2022 | 6:08 PM

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी, हो मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे, असं ते म्हणाले.

विरोधकांनी गेल्या चार दिवसापासून अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना घेरताना अनेक घोषणा दिलेल्या आहेत. तसेच शिंदे गटावर टीका देखिल केली आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखिल टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधताना, ते कंत्राटी मुख्यमंत्री असल्याचे विरोधकांनी म्हटलं होतं. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी, हो मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे, असं ते म्हणाले. यावेळी शिंदे यांनी, आज माझा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला गेला. तसा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव टाकरे यांचा केला म्हणून उचलून तुरुंगात टाकलं होतं. हे विसरला का? तर मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांच दु:ख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

 

Published on: Aug 25, 2022 06:08 PM
Sharmila thackeray | इतर पक्षांमधील अराजकीय घटना बघता चांगला महाराष्ट्र घडवायचा असेल तर सोबत या-tv9
Pune MNS Banner | हिंदूंचा हिंदूस्थान, मनसेचा नवा अजेंडा, पुण्यात बॅनरबाजी