आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय घडतंय

| Updated on: Oct 16, 2024 | 6:40 PM

अडीच वर्षे अजितदादांकडे असलेल्या आमदार राजेंद्र शिंगणे आता पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या प्रवेशाला घरातूनच विरोध होत आहे.

राष्ट्रवादीत फूट झाल्यानंतर अजितदादा बरोबर गेलेले आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात पुन्हा परतण्याचे संकेत त्यांनीच दिलेले आहेत. परंतू शरद पवार यांच्या सोबत राहीलेल्या त्यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनीच आपल्या काकांना विरोध केला आहे. तसेच निवडणूक लढविण्याची इच्छा देखील प्रदर्शित केलेली आहे. तसेच पक्षाकडून जर तिकीट न मिळाल्या अपक्ष निवडणूक लढविण्याचे देखील म्हटले आहे. त्यामुळे सिद्धखेड राजा मतदार संघात आता काका विरोधात पुतणी अशी लढत होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांची साथ सोडली. परंतू आता ते पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत. परंतू त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा पासून गायत्री शिंगणे शरद पवार गटात कार्यरत होते.त्यांनी आपण गेली पाच वर्षे पक्षाचे कार्य करीत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्याची तयारी केली आहे.त्यादृष्टीने सिंदखेड राजा मतदारसंघात गाठी भेटी, दौरे करण्यास सुरूवात केली आहे.

Published on: Oct 16, 2024 06:38 PM
एकनाथ शिंदे यांच्या ‘त्या’वक्तव्यावर अजितदादा का मानखाली घालून खुदूखुदू हसले ?
विरोधक-सत्ताधारी दोघेही ‘मुख्यमंत्री पदा’ चा चेहरा जाहीर करेनात, दोघांचे ‘पहेले आप’ सुरुच