कोकण, विदर्भासह राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’; सतर्कतेचा इशारा
तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील सुमारे 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
मुंबई, 24 जुलै 2023 | राज्यात पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. आज (ता. २४) कोकण, घाटमाथा आणि विदर्भातात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या मुंबई, पुण्यात पावसाची रिपरिप होत असून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात नद्यांनी त्यांचे पात्र ओलांडले आहे. कोल्हापूरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील सुमारे 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यातच धरणक्षेत्रासह जिल्ह्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाला असून पूरबाधित गावांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर NDRF ची 1 तुकडी कोल्हापुरात दाखल झाली आहे.