खड्डे खोदले अन् स्वत:ला गाढून घेतलं, शिंदे सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक

| Updated on: Oct 27, 2022 | 10:22 AM

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय...

उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास हिरावला. अशात शेतकरी हवालदिल झालाय. ऐन दिवाळीत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. पीकविमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा विमा सरकारने दिला नाही. त्यामुळे आंदोलन केल्याचं हे शेतकरी सांगत आहेत. शेतात खड्डे खोदून स्वत:ला गाढून घेत शेतकरी हे आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आमदार कैलास पाटील यांनी दिवाळीपासून म्हणजे मागच्या चार दिवसापासून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.

….मग नोटांवर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हवा, शिवसेनेची भूमिका नेमकी काय?
राणा दाम्पत्याची नौटंकी सर्वांनाच माहिती, किशोरी पेडणेकरांचा पुन्हा हल्लाबोल